मुंबई - प्रो कबड्डीच्या सातव्या हंगामाला २० जुलैपासून सुरुवात झाली. सलामीच्याच सामन्यात यू मुबांने तेलगू टायटन्सला धूळ चारत हंगामात आपला विजयारंभ केला. या स्पर्धेच्या जेतेपदासाठी यू मुंबाची कसरत पाहता ते जास्त मेहनत घेताना दिसून येत आहेत.
यंदाच्या मोसमासाठी इराणच्या फझल अत्राचलीकडे यू मुंबाची धुरा देण्यात आली आहे. तर उपकर्णधार म्हणून संदीप नरवाल याची नियुक्ती करण्यात आली आहे. आत्तापर्यंत झालेल्या सहा सामन्यांत यू मुंबाने १७ गुण मिळवत गुणतालिकेत अग्रस्थान राखले आहे.