नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियाचा दिवंगत दिवंगत फिरकी गोलंदाज आणि महान खेळाडू शेन वॉर्न यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे सर्व खेळाडू राष्ट्रगीतादरम्यान हॅट परिधान करतील. (Boxing Day Test) याच वर्षी मार्चमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. (Boxing Day Test For Shane Warne ) शेन वॉर्न अवघा ५२ वर्षांचा होता. वॉर्न हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज होता. (AUS SA Boxing Day Test )
ऑस्ट्रेलियात सध्या बिग बॅश लीग आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिका सुरू आहे. बिग बॅश लीगमध्ये शेन वॉर्नला श्रद्धांजली वाहण्यात येत आहे, त्यामुळे आता ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात या माजी दिग्गज फिरकीपटूला वेगळ्या प्रकारची श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू शेन वॉर्नला श्रद्धांजली म्हणून बॉक्सिंग डे कसोटीत राष्ट्रगीता दरम्यानहॅट परिधान करतील.