महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Tokyo Paralympics : मानलं रे पठ्ठ्या! विश्वविक्रमासह सुमित अंतिलने जिंकले सुवर्ण पदक - अवनी लेखरा

भारताचा भालाफेकपटू सुमित अंतिल याने पुरुषांच्या F64 भालाफेक गटात सुवर्ण पदक जिंकले.

Sumit Antil clinches Gold for India in Men's Javelin Throw F64 event
Tokyo Paralympics : मानलं रे पठ्ठ्या! विश्व विक्रमासह सुमित अंटिलने जिंकले सुवर्ण पदक

By

Published : Aug 30, 2021, 5:02 PM IST

Updated : Aug 30, 2021, 7:20 PM IST

टोकियो - भालाफेकपटू सुमित अंतिल याने टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्ण पदक जिंकून दिले. त्याने पुरूष एफ 64 गटात ही सुवर्ण किमया साधली. टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये भारताचे हे दुसरे सुवर्ण पदक ठरले. याआधी महिला नेमबाज अवनी लेखराने सुवर्ण पदक जिंकले आहे.

सुमित अंतिल याने पुरुषांच्या F64 भालाफेक गटात पहिल्याच प्रयत्नात 66.95 मीटर लांब भाला फेकत विश्वविक्रम नोंदवला. दुसऱ्या प्रयत्नात त्याने आणखी लांब भाला फेकताना 68.8 मीटरसह नवा विश्वविक्रम आपल्या नावावर केला.

तिसऱ्या प्रयत्नात सुमित अंतिल याने 65.27 मीटर लांब भालाफेक फेकला. पण इतर स्पर्धकांच्या तुलनेत त्याने याही फेरीत चांगली कामगिरी करून दाखवली. पाचव्या प्रयत्नात त्याने पुन्हा 68.55 मीटर लांब भाला फेकत पुन्हा स्वतःचाच विश्वविक्रम मोडला. या कामगिरीसह त्याने सुवर्णपदक आपल्या नावे केला.

याआधी, टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये भारताचा स्टार भालाफेकपटू देवेंद्र झाझरिया याने आज सकाळी रौप्य पदक जिंकले. तर दुसरा भालाफेकपटू सुंदर सिंह गुर्जर याने कास्य पदक जिंकले आहे.

दरम्यान, भारताचे टोकियो पॅराऑलिम्पिकमधील हे सातवे पदक आहे. तर आजच्या दिवसातील हे पाचवे पदक आहे.

अवनी लेखराचा सुवर्ण वेध

टोकियोत सुरू असलेल्या पॅराऑलिम्पिकमध्ये भारताची अवनी लेखरा हिने सुवर्ण पदक जिंकले. अवनी लेखराने महिला 10 मीटर एअर रायफलच्या (एसएच1) अंतिम सामन्यात सुवर्ण पदक जिंकत इतिहास रचला. ती पॅराऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी भारताची पहिली महिला खेळाडू ठरली.

हेही वाचा -Exclusive: पॅरा अॅथलिट पहिल्यापासूनच रिअल हिरो आहेत, सुवर्णपदक विजेत्या अवनीच्या वडिलांची प्रतिक्रिया

हेही वाचा -Tokyo Paralympics : भारताची पॅरालिम्पिकमध्ये 7 पदकांची कमाई; अवनी लेखराचा सुवर्णवेध...

Last Updated : Aug 30, 2021, 7:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details