टोकियो - टोकियो पॅराऑलिम्पिक स्पर्धेच्या शुटिंग खेळात भारताचा सिंघराज अदाना याने कास्य पदक जिंकले. त्याने पुरूष 10 मीटर एअर पिस्तूल एसएच1 च्या अंतिम फेरीत तिसरे स्थान पटकावले. हरियाणाच्या या पॅरा शूटरने 216.8 पाँईट घेत भारताला कास्य पदक जिंकून दिले. चीनच्या यांग चाओ याने 237.9 अशी कामगिरी करत सुवर्ण पदक जिंकले. तर चीनचा हुआंग जिंग 237.5 पाँईट्ससह रौप्य पदकाचा विजेता ठरला.
फरिदाबाद येथे राहणारा 39 वर्षीय सिंघराज अदाना पात्रता फेरीत सहाव्या स्थानावर होता. त्याने 569 पाँईट्स घेतले होते. तर 19 वर्षीय मनिष नरवाल पात्रता फेरीत 575 पाँईट्ससह पहिल्या क्रमांकावर होता. पण त्याने अंतिम फेरीत निराश केले.
सिंघराजला पहिल्या तीनमध्ये स्थान मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. चिनी खेळाडूंनी अंतिम सामन्यात वर्चस्व निर्माण केले होते. अशात सिंघराजचा 19वा शॉट व्यवस्थित लागला नाही. यामुळे तो पिछाडीवर गेला. पण त्याने याची कसर 20व्या शॉटमध्ये भरून काढली. दुसरीकडे चीनच्या झियालोंग लोउ याला या शॉटवर 8.6 पाँईट घेता आले.