अहमदाबाद -टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये महिला टेबल टेनिसपटू भाविनाबेन पटेल हिने ऐतिहासिक रौप्य पदक जिंकले. पॅराऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी भाविनाबेन भारताची दुसरी माहिला खेळाडू ठरली. याआधी दीपा मलिक हिने रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले होते. दरम्यान, टोकियो पॅराऑलिम्पिकला जाण्याआधी 'ईटीव्ही भारत'ने भाविनाबेन पटेलसोबत बातचित केली. यात तिने म्हटलं होतं की, कठोर सराव आणि समपर्ण दिल्यास काहीही अशक्य नाही.
भाविनाबेन पटेलसोबत 'ईटीव्ही भारत'चे ब्यूरो चीफ भरत पंचाल यांनी बातचित केली. यात भाविनाबेन म्हणाली की, टोकियो पॅराऑलिम्पिकसाठी पात्र ठरणे हे माझे स्वप्न होते. यासाठी मी पूर्ण तयारी केली होती. मी एका लहान गावातून आले. यामुळे शहरात राहणे, तेथील परिस्थितीशी जुळूवून घेणे हे माझ्यासाठी एक चॅलेज होते. पण हळूहळू सर्व काही ठीक होत गेले. मला खेळात पुढे आणण्यात, ब्लाईंड पीपल्स असोसिएशनने चांगला प्लॅटफॉर्म दिला. यामुळेच मी पुढे येऊ शकले.
भाविनाबेन पटेलचे प्रशिक्षक लालन दोषी यांनी सांगितलं की, प्रत्येक देशाचे खेळाडू, इतर खेळाडूंचे सामन्याचे व्हिडिओ पाहून पुढील रणणिती आखतात. पण भाविनाबेन अशी रणणिती आखत नाही. ती दररोज 8 ते 9 तास सराव करते. यामुळे तर ती जागतिक क्रमवारीत 8व्या स्थानावर आहे.
भाविनाबेन पटेलची नरेंद्र मोदींशी भेट -
2010 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेसाठी नरेंद्र मोदी यांनी भाविनाबेन पटेला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते.