महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Tokyo Paralympics : भारताचा पदकतालिकेत डंका, पॅराऑलिम्पिकमधील सर्वोत्कृष्ठ कामगिरी - सुमित अंतिल

भारतीय पॅरा अॅथलिट खेळाडूंनी टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी केली. टोकियो पॅराऑलिम्पिकच्या पदकतालिकेत भारत 26व्या स्थानावर पोहोचला आहे. पॅराऑलिम्पिक इतिहासामधील भारताची ही सर्वोत्कृष्ठ कामगिरी ठरली आहे.

Tokyo Paralympics : Shooter Manish Narwal, shuttler Pramod Bhagat scoop a gold each to take India to 26th spot
Tokyo Paralympics : भारताचा पदकतालिकेत डंका, पॅराऑलिम्पिकमधील सर्वोत्कृष्ठ कामगिरी

By

Published : Sep 4, 2021, 8:12 PM IST

टोकियो -भारतीय नेमबाज मनिष नरवाल आणि पॅरा बॅडमिंटनपटू प्रमोद भगत यांनी आज टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये सुवर्ण कामगिरी नोंदवली. मनिषने पी4 मिक्स्ड 50 मीटर पिस्तुल एसएच1 गटात सुवर्ण पदक जिंकले. तर प्रमोद भगत याने बॅडमिंटन एसएल 3 गटाच्या अंतिम सामन्यात ब्रिटनच्या डेनियल बेथेल याचा 21-14, 21-17 अशा फरकाने पराभव करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. मनिष आणि प्रमोद भगतच्या सुवर्णाच्या जोरावर भारत टोकियो पॅराऑलिम्पिकच्या पदकतालिकेत 26 व्या स्थानी पोहोचला आहे.

या भारतीय खेळाडूंनी टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये जिंकली पदकं -

खेळाडू पदक खेळ
भाविनाबेन पटेल रौप्य पदक

महिला सिंगल टेबल टेनिस क्लास 4

निषाद कुमार रौप्य पदक

पुरूष उंच उडी टी 47

अवनी लेखरा सुवर्ण पदक

महिला 10 मीटर एअर शुटींग एसएस 1

देवेंद्र झाझरिया रौप्य पदक

पुरूष भालाफेक एफ 64

सुंदर सिंग गुर्जर कास्य पदक

पुरूष भालाफेक एफ 64

योगेश काठूनिया रौप्य पदक

पुरूष थाळी फेक एफ56

सुमित अंतिल सुवर्ण पदक

पुरूष भालाफेक एफ64

सिंघराज अदाना

कास्य पदक पुरूष10 मीटर पिस्तुल एसएच1 सिंघराज अदाना

रौप्य पदक

मिक्स्ड 50 मीटर एसएच1 मयप्पन थंगावेलू रौप्य पदक

उंच उडी टी42

शरद कुमार कास्य पदक उंच उडी टी 42 प्रविण कुमार रौप्य पदक

पुरूष उंच उडी टी 64

हरविंदर सिंग

कास्य पदक

पुरूष वैयक्तिक रिकर्व (तिरंदाजी)

मनिष नरवाल

सुवर्ण पदक पुरूष पी4 मिक्स्ड 50 मीटर एसएच1

प्रमोद भगत

सुवर्ण पदक बॅडमिंटन पुरूष सिंगल एसएल3

मनोज सरकार

कास्य पदक बॅडमिंटन एसएल 3

हेही वाचा -टोकियो पॅरालिम्पिक : नेमबाजीत मनिष नरवालने सुवर्ण तर सिंहराजने रौप्य पदक पटकावले

हेही वाचा -Tokyo Paralympics : नरेंद्र मोदी, अभिनव बिंद्रासह विरेंद्र सेहवागने केलं पॅरा नेमबाजांचे कौतुक

ABOUT THE AUTHOR

...view details