टोकियो - भारतीय नेमबाज महावीर स्वरुप उनहाळकर याचे टोकियो पॅराऑलिम्पिकमधील पदक हुकले. महावीर याला टोकियो पॅराऑलिम्पिकमधील पुरूष 10 मीटर एअर रायफल स्टॅडिंग एसएच1 स्पर्धेत चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. उनहाळकर 203.9 गुणांसह चौथ्या स्थानावर राहिला. कोल्हापुरचा हा 34 वर्षीय खेळाडू स्पर्धेत एक वेळ पुढे होता. परंतु सहा सीरिजमध्ये 9.9 आणि 9.5 गुण घेतल्यानंतर तो पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडला.
चीनच्या चाओ डोंग याने (246.5 गुण) पॅराऑलिम्पिक रेकॉर्डसह सुवर्ण पदक जिंकले. यूक्रेनचा आंद्रिए डोरोशेंको (245.1) रौप्य पदकाचा मानकरी ठरता. तर कोरियाचा जिन्हो पार्क याने 224.5 गुणांसह कास्य पदक जिंकले.
दरम्यान, भारताचा आणखी एक नेमबाज क्वालिफायर फेरीतच बाहेर पडला. त्याने 592.2 गुणांसह 20 वे स्थान पटकावले. तर उनहाळकर 615.2 गुणांसह सातव्या स्थान मिळवत अंतिम फेरीसाठी पात्र ठरला होता.