टोकियो - भारताचे तीन खेळाडू प्रमोद भगत, कृष्णा नागर आणि सुहास यतिराज यांनी आज टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये पुरूष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेच्या आपापल्या गटात अंतिम फेरी गाठली आहे. तर मनोज सरकार आणि तरूण ढिल्लो यांचा उपांत्य फेरीत पराभव झाला.
जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेला आणि आशियाई चॅम्पियन 33 वर्षीय प्रमोद भगत याने एसएल3 गटामध्ये जपानच्या दाइसुके फुजीहारा याचा 36 मिनिटात 21-11, 21-16 अशा धुव्वा उडवला. या विजयासह भगत पॅराऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच समावेश करण्यात आलेल्या बॅडमिंटन खेळात अंतिम फेरी गाठणारा पहिला भारतीय ठरला. अंतिम सामन्यात त्याचा सामना ब्रिटनच्या डेनियल बेथेल याच्याशी होणार आहे.
एसएल4 गटात सुहास यथिराज याने इंडोनेशियाच्या फ्रेडी सेतियावान याचा 31 मिनिटात पराभव केला. त्याने हा सामना 21-9, 21-15 अशा फरकाने जिंकला. अंतिम सामन्यात त्याचा सामना फ्रान्सच्या लुकास माजूर याच्याशी होणार आहे.
दुसऱ्या मानांकित कृष्णा नागर याने ब्रिटनच्या क्रिस्टिन कुम्ब्स याचा एसएच6 गटात 21-10, 21-11 ने पराभव केला. अंतिम सामन्यात त्याची गाठ हाँगकाँगच्या चु मान केइ याच्याशी होणार आहे.
मनोजचा पराभव