मुंबई - भारतीय नेमबाज मनिष नरवाल आणि सिंघराज यांनी टोकियो पॅराऑलिम्पिकच्या पी4 मिक्स्ड 50 मीटर पिस्तुल एसएच1 गटात अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक गटात पहले सुवर्ण पदक जिंकणारा अभिनव बिंद्रा याच्यासह विरेंद्र सेहवाग याने मनिष आणि सिंघराज यांचे अभिनंदन केले आहे.
मोदी काय म्हणाले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. ते ट्विटमध्ये म्हणतात, टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचा क्रम जारी आहे. युवा आणि प्रतिभावान खेळाडू मनिष नरवाल याने शानदार कामगिरी केली. त्याचे सुवर्ण पदक भारतासाठी खास आहे. त्याचे अभिनंदन आणि आगामी कामगिरीसाठी त्याला शुभेच्छा.
सिंघराज यांच्या रौप्य पदकाविषयी मोदींनी म्हटलं की, सिंघराज याने पुन्हा एकदा कमाल केली. त्याने आणखी एक पदक आपल्या नावे केलं. मिस्क्ड 50 मीटर पिस्तुल एसएच1 मध्ये त्यानेपदक जिंकलं. या कामगिरीसह त्याने भारताला आनंदोत्सव साजरा करण्याची संधी दिली. सिंघराजचे अभिनंदन आणि त्याला भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.