जयपूर -टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय पॅरा अॅथलिटनी दमदारी कामगिरी केली. यात बॅडमिंटनमध्ये कृष्णा नागर याने सुवर्णपदकाला गवसणी घातली. यानंतर त्याच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशात त्याला बॅडमिंटनपटून नव्हे क्रिकेटर व्हायचं होतं, ही बाब समोर आली आहे. याची कबुली खुद्द कृष्णा नागर यानेच दिली आहे. दरम्यान, कमी उंचीमुळे त्याचे क्रिकेटर होण्याची स्वप्न भंगले.
कृष्णा नागर म्हणाला की, मला सुरूवातीच्या काळात क्रिकेट खेळणे पसंत होते. पण नंतर मी बॅडमिंटनच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण करता येईल. याचा विचार केला. यामुळे मी हाती रॅकेट घेतलं आणि कठोर सरावाला सुरूवात केली. मला यात माझे मित्र तसेच कुटुंबीयांकडून पाठिंबा मिळाला. त्यांनी मला या खेळात नाव कमावण्यासाठी प्रेरित केलं.
कृष्णा नागर याच्या वडिलांनी सांगितलं की, ग्रोथ हार्मोंनच्या कमतरतेमुळे कृष्णाची उंची वाढू शकली नाही. त्याची उंची 4 फूट 2 इंच इतकीच राहिली. तरीदेखील आमचे कुटुंब निराश झालो नाही. उलट आम्ही त्याला पुढे जाण्यासाठी प्रेरित केलं.