टोकियो - भारतीय भालाफेकपटू सुमित अंतिलने टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकले. सुमितच्या सुवर्ण कामगिरीबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंचे देखील राहुल गांधींनी कौतुक केले आहे.
राहुल गांधी त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात की, दिवसाची सुरूवात अवनी लेखराने सुवर्ण पदक जिंकल्याच्या बातमीने झाली. तिचे खूप खूप अभिनंदन. आणखी एका मुलीने भारताचे नाव उज्वल केले.
सुमित अंतिलने भालाफेकमध्ये सुवर्ण पदक जिंकल्यानंतर राहुल गांधी म्हणतात की, सुमित अंतिलचे सुवर्ण पदकासाठी अभिनंदन. संपूर्ण देश अद्भभूत धैर्य आणि समर्पणासाठी तुझी प्रशंशा करत आहे.
काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी देखील अवनी लेखरा आणि सुमित अंतिल यांचे कौतुक केले आहे. त्या त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात की, अवनी लेखरा जी, तुमचे अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा. संपूर्ण देशासाठी हा गौरवाचा क्षण आहे. सुमित अंतिलचे अभिनंदन. ऐतिहासिक प्रदर्शनावर संपूर्ण देशाला अभिमान आहे.