महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Tokyo Paralympics: भालाफेकमध्ये रणजित भाटीची निराशजनक कामगिरी - भाविनाबेन पटेल

टोकियो पॅराऑलिम्पिकच्या पाचव्या दिवशी भारताने दमदार सुरूवात केली. टेबल टेनिसपटू भाविनाबेन पटेलने महिला एकेरी क्लास4 मध्ये अंतिम फेरी गाठली. यानंतर तिरंदाज राकेश कुमारने पुढील फेरी गाठली. तर पुरूष भालाफेकपटू रणजित भाटीने निराशजनक कामगिरी केली. त्याने सलग सहा थ्रो फाउल फेकले.

Tokyo Paralympics: indian-javelin-thrower-ranjeet-bhati-misfires-in-all-six-attempts-out-of-final
Tokyo Paralympics: भालाफेंकमध्ये रणजित भाटीची निराशजनक कामगिरी

By

Published : Aug 28, 2021, 7:55 PM IST

टोकियो -भारताची पॅरा अॅथलिट टेबल टेनिस खेलाडू भाविनाबेन पटेल हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला. तिने महिला एकेरीच्या क्लास-4 गटात अंतिम फेरी गाठली आहे. भाविनाबेन पटेलच्या या कामगिरीमुळे भारताचे एक पदक निश्चित झाले आहे.

भाविनाबेन पटेलने उपांत्य फेरीत चीनच्या झांग मियाओ हिचा 3-2 ने पराभव केला. या सामन्यात भाविनाबेन पटेलने पहिला गेम 11-7 ने गमावला. त्यानंतर तिने दुसरा गेम 11-7 ने जिंकत बरोबरी साधली. त्यानंतर तिसऱ्या गेममध्ये दमदार कामगिरी करत हा गेम तिने 11-4 असा जिंकत सामन्यात आघाडी मिळवली. पण चौथ्या गेममध्ये चीनच्या झांग मियाओ हिने वापसी करत हा गेम 11-9 असा जिंकला. निर्णायक गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी जोरदार खेळ केला. परंतु भाविनाबेन या गेममध्ये झांग मियाओवर वरचढ ठरली. तिने हा गेम 11-8 अशा जिंकत अंतिम फेरीत धडक मारली.

अंतिम सामन्यात भाविनाबेन सुवर्ण पदकासाठी झुंजणार आहे. दरम्यान, शुक्रवारी भाविनाबेन पटेलने उपांत्यपूर्व फेरीत सार्बियाची खेळाडू बोरिस्लावा पेरिच रांकोविच हिचा 17 मिनिटात 11-5, 11-6, 11-7 असा सहज धुव्वा उडवला होता.

तिरंदाजीत राकेश कुमारचा विजय

तिरंदाज राकेश कुमार याने राउंड 16 मध्ये विजय मिळवला. या विजयासह राकेश कुमारने पुढील फेरी गाठली आहे. त्याने हाँगकाँगच्या चुएन एंगाई याचा 144-131 अशा फरकाने पराभव केला. त्याचा पुढील सामना 31 ऑगस्ट रोजी होईल. दुसरीकडे श्याम सुंदर स्वामीला दुसऱ्या फेरीत पराभव पत्कारावा लागला.

रणजित भाटीची सुमार कामगिरी -

पुरूष एफ-57 भालाफेकच्या अंतिम फेरीत भारतीय रणजित भाटीने निराश केले. त्याने सलग सहा थ्रो फाउल फेकले.

हेही वाचा -Asian Youth and Junior Championships: भारताचे 3 बॉक्सर अंतिम फेरीत

हेही वाचा -टोकियो पॅरालिम्पिक 2020 : पहिल्यांदाच भारताची टेबल टेनिस खेळाडू उपांत्यफेरीत; भाविना पटेलची कामगिरी

ABOUT THE AUTHOR

...view details