टोकियो - टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंने जिंकलेले पदक काढून घेण्यात आले आहे. यामुळे भारताचे एक पदक कमी झाले आहे.
भारतीय थाळीफेकपटू विनोद कुमार याने F52 गटात कास्य पदक जिंकले. यानंतर विनोद कुमार हा या कॅटीगरीसाठीच्या नियमात बसत नसल्याचे सांगत प्रतिस्पर्धी खेळाडूंनी आक्षेप नोंदवला. तेव्हा तपासाअंती त्यांच्याकडून कास्य पदक काढून घेण्याचा निर्णय आयोजन समितीने घेतला.
नेमके काय आहे प्रकरण -
विनोद कुमारने रविवारी 19.91 मीटर लांब थाली फेकली आणि तो कास्य पदकाचा मानकरी ठरला. तेव्हा प्रतिस्पर्धी खेळाडूंनी विनोद कुमार F52 गटाच्या कॅटिगरीसाठीच्या नियमात बसत नसल्याचे सांगत आक्षेप नोंदवला. तेव्हा आयोजन समितीने विनोद कुमारचे पदक होल्डवर ठेवण्याचा निर्णय घेतला. तपासात विनोद कुमार या कॅटिगरीसाठी पात्र ठरला नाही. तेव्हा आयोजन समितीने त्याचे पदक काढून घेतले.
भारताचे मिशन प्रमुख गुरशरण सिंह यांनी याविषयी सांगितलं की, तपासाअंती विनोद कुमार क्लालिफिकेशनच्या कॅटिगरीत बसला नाही. यामुळे आयोजन समितीने त्याचे पदक काढून घेतले आहे.