महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

टोकियो पॅरालिम्पिकचे वेळापत्रक जाहीर - schedule of tokyo paralympic

या खेळांमध्ये 21 ठिकाणी 22 खेळांच्या 539 स्पर्धा होणार आहेत. यावर्षी ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते, परंतु कोरोना व्हायरसमुळे ही स्पर्धा पुढील वर्षासाठी पुढे ढकलली गेली आहे.

tokyo paralympic 2021 schedule announced
टोकियो पॅरालिम्पिकचे वेळापत्रक जाहीर

By

Published : Aug 3, 2020, 2:18 PM IST

नवी दिल्ली - टोकियो ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक आयोजन समितीने सोमवारी पुढील वर्षीच्या पॅरालिम्पिक खेळांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. पुढील वर्षी 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा खेळवण्यात येईल.

या खेळांमध्ये 21 ठिकाणी 22 खेळांच्या 539 स्पर्धा होणार आहेत. यावर्षी ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते, परंतु कोरोनाव्हायरसमुळे ही स्पर्धा पुढील वर्षासाठी पुढे ढकलली गेली आहे.

पॅरालिम्पिक खेळ सुरू झाल्यानंतर एक दिवसानंतर 25 ऑगस्ट रोजी महिलांना सायकलिंगसाठी प्रथम पदक देण्यात येईल. त्याच दिवशी एकूण 24 स्पर्धांमध्ये पदके प्रदान करण्यात येणार आहेत, ज्यात 16 जलतरण, 4 व्हीलचेअर फेन्सिंग आणि 4 सायकलिंगमधील पदकांचा समावेश आहे.

उद्घाटन व निरोप समारंभ ऑलिम्पिक स्टेडियममध्येच होणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details