टोकियो - भारताचा अव्वल पुरूष बॉक्सर अमित पांगलचे टोकियो ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आले. 52 किलो वजनी गटात पांघलचा कोलंबियाच्या युबेरजेन मार्तीनिझ याने 4-1 ने पराभव केला. दरम्यान, अमित पांघलकडून देशाला पदकाच्या आशा होत्या. त्या आशा धूळीस मिळाल्या आहेत. दरम्यान, युबेरजेन मार्तीनिझ हा रिओ ऑलिम्पिक 2016 चा रौप्य पदक विजेता खेळाडू आहे.
अमित पांगलचे हे पहिलं ऑलिम्पिक होतं. कोलंबियाच्या युबेरजेन मार्तीनिझ याने पांघलवर सुरूवातीपासून सामन्यात दबाव निर्माण केला होता. पण पांघलने शानदार वापसी करत, पहिल्या फेरी अवघ्या तीन मिनिटात 4-1 अशी जिंकली. त्यानंतर कोलंबियाच्या युबेरजेन मार्तीनिझचा सामना करण्यात पांघल अपयशी ठरला.
दुसऱ्या फेरीत कोलंबियाच्या बॉक्सरने पांघलला जोरदार ठोसे मारले. ज्याचे उत्तर पांघलला देता आलं नाही. तीन मिनिटांपर्यंत हा क्रम जारीच होता. पांघल फक्त बचाव करत राहिला.