टोकियो - यावर्षी होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक व पॅरालिम्पिक स्पर्धा कोरोना व्हायरसमुळे एका वर्षासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या स्पर्धांच्या नवीन तारखांची घोषणा झाली असून स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, ऑलिम्पिक स्पर्धा आता २३ जुलै ते ८ ऑगस्ट २०२१ या काळात होणार आहेत. तर पॅरालिम्पिक स्पर्धा २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान आयोजित केल्या जातील.
ऑलिम्पिकच्या नव्या तारखांची घोषणा, 'या' महिन्यात रंगणार थरार - ऑलिम्पिकच्या नव्या तारखांची घोषणा न्यूज
जपानच्या क्योडो न्यूज एजन्सीनुसार, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) आणि स्थानिक आयोजन समितीने सोमवारी बैठक घेऊन नवीन तारखांची घोषणा केली. भारतीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओए) सूत्रांनीही याची पुष्टी केली.
ऑलिम्पिकच्या नव्या तारखांची झाली घोषणा, 'या' महिन्यात रंगणार थरार
जपानच्या क्योडो न्यूज एजन्सीनुसार, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) आणि स्थानिक आयोजन समितीने सोमवारी बैठक घेऊन नवीन तारखांची घोषणा केली. भारतीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओए) सूत्रांनीही याची पुष्टी केली.
कोरोना व्हायरसमुळे हे ऑलिम्पिक स्पर्धा एका वर्षासाठी पुढे ढकलल्या गेल्या आहेत. या स्पर्धा यापूर्वी २४ जुलै ते ९ ऑगस्ट दरम्यान होणार होत्या.