टोकियो - टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारताची सुरूवात दमदार झाली. दुसऱ्या दिवशी भारताच्या झोळीत एक पदक पडले. आज शनिवारी वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूने रौप्यपदक जिंकत भारताचे पदकाचे खाते उघडले. 223 देशांमध्ये भारताने पदकतालिकेत मजबूत पकड निर्माण केली आहे.
सायंकाळी 4 वाजेपर्यंत पदक तालिकेची स्थिती पाहिल्यास भारत संयुक्तपणे पाचव्या नंबरवर आहे. भारताच्या नावे एक पद आहे. तर चीनने दोन सुवर्ण आणि एक कांस्य पदक जिंकले आहे. ते तीन पदकासह पदक तालिकेत अव्वलस्थानी आहेत. चीननंतर इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण, रिपब्लिक ऑफ कोरिया आणि इक्वेडोर यांचा नंबर लागतो. या तिन्ही देशांनी प्रत्येकी 1-1 सुवर्णपदक जिंकले आहेत.