महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Tokyo Olympics: सुवर्ण पदकाच्या शर्यतीत नीरज चोप्रासमोर 'या' 5 दिग्गजांचे आव्हान - जाकुब जादलिच

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा आज टोकियो ऑलिम्पिकमध्ये अंतिम सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

tokyo-olympics-javelin-throw-final-neeraj-chopra-and-his-5-gold-medal-challengers
Tokyo Olympics: सुवर्ण पदकाच्या शर्यतीत नीरज चोप्रासमोर आहे या '5' दिग्गजांचे आव्हान

By

Published : Aug 7, 2021, 3:22 PM IST

Updated : Aug 7, 2021, 3:35 PM IST

टोकियो - भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा आज टोकियो ऑलिम्पिकमध्ये अंतिम सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. पात्रता फेरीत त्याने पहिल्याच प्रयत्नात 86.65 मीटर लांब भाला फेकत आपण देखील पदकाचे दावेदार असल्याचे दाखवून दिले. नीरज ग्रुप ए मध्ये पहिल्या स्थानावर होता. पण अंतिम सामन्यात नीरज चोप्रासमोर जगातील दिग्गज भालाफेकपटूंचे आव्हान असणार आहे. वाचा कोण आहेत ते भालाफेकपटू...

जोहानेस वेटर

जर्मनीचा खेळाडू जोहानेस वेटर पदकाचा प्रबळ दावेदार आहे. 28 वर्षीय वेटर सातत्याने 90 मीटर लांब भाला फेकण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याने विश्व चॅम्पियनशीपसह अनेक स्पर्धेत पदकं जिंकली आहेत. त्याचा सर्वश्रेष्ठ 97.76 इतका आहे.

जाकुब जादलिच

चेक रिपब्लिकचा जाकुब टोकियो ऑलिम्पिकमध्ये पात्रता फेरीत ग्रुप बी मध्ये दुसऱया स्थानावर होता. त्याने 84.93 मीटर लांब भाला फेकला. त्याचा सर्वश्रेष्ठ 89.73 मीटर इतके आहे.

अर्शद नदीम

पाकिस्तानचा अर्शद नदीम देखील पदकाच्या शर्यतीत आहे. त्याने पात्रता फेरीत 85.16 मीटर लांब भाला फेकला होता. त्याचा सर्वश्रेष्ठ 86.38 आहे.

विटदेस्लाव वेसेली

चेक रिपब्लिकचाविटदेस्लाव वेसेली हा टॉप भालाफेकपटूंमधील एक आहे. त्याने पात्रता फेरीत ग्रुप ए मध्ये पाचवे स्थान मिळवले होते. त्याने 83.04 मीटर लांब भाला फेकला होता. वेसेली याने आतापर्यंत विश्व चॅम्पियनशीपसह अनेक स्पर्धांमध्ये पदके जिंकली आहेत.

जुलियन वेबर

जर्मनीचा भालाफेकपटू जुलियन वेबर देखील पदकाचा दावेदार आहे. त्याने पात्रता फेरीत 84.41 मीटर लांब भाला फेकला होता. त्याचे सर्वश्रेष्ठ 88.29 मीटर आहे.

  • नीरज चोप्राकडून पदकाच्या आशा का?

रिओ ऑलिम्पिकमध्ये त्रिनिदाद अॅण्ड टोबॅगोचा केशोरन वाल्कॉट याने 85.38 मीटर लांब भाला फेकत कास्य पदक जिंकलं होतं. अशात नीरज चोप्रा याने त्याचा सर्वश्रेष्ठ थ्रो 88.07 मीटरच्या कामगिरीची पुनरावृत्ती केली तर तो पदक जिंकू शकतो.

Last Updated : Aug 7, 2021, 3:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details