मुंबई -भारताचा स्टार टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमलचे टोकियो ऑलिम्पिकमधील आव्हान तिसऱ्या फेरीत संपुष्टात आले. मिश्र दुहेरीत शरथ कमल मनिका बत्रासोबत खेळत होता. परंतु तिथे देखील भारतीय जोडीला पदक जिंकण्यात अपयश आले. याविषयावर ईटीव्ही भारतने शरथ कमलशी बातचित केली. यात शरथ कमलने विविध विषयावर भाष्य केलं.
तू गतविजेता लोंगचा पराभव करण्यासाठी सक्षम होतास का, सामन्याबाबत तुझी काय मानसिकता होती, असा प्रश्न शरथ कमलाला विचारला असता शरथ यावर म्हणाला, 'स्पर्धा सुरू होण्याआधी मला माहिती होत की, माझ्यासाठी हा ड्रॉ खूप कठीण आहे. दुसऱ्या फेरीत अपोलोनिया, ज्याला मी मागील 15 वर्षांत कधीही पराभूत करू शकलो नव्हतो. तरी देखील मी सकारात्मक विचार करत त्याच्या सामोरे गेले. यामुळे पुढे कोणता खेळाडू आहे हे महत्वाचं ठरत नाही. मी फक्त सामना जिंकण्याचा विचार करतो.'
मी हाच निर्धार मनाशी बाळगत लोंगविरुद्ध मैदानात उतरलो. सामन्यात मी तिसरा सेट जिंकलो. कदाचित मी सामना जिंकू शकलो असतो तर हा सामना वेगळाच असता. दुर्दैवीरित्या मी जिंकू शकलो नाही. लोंगवर मी दबाव निर्माण केला होता. परंतू तो यातून सावरला. मी माझ्या कामगिरीवर खूश आहे. मी लोंगविरुद्दच्या सामन्यात चांगले शॉट खेळलो. यासाठी मी खूप मेहनत घेतली. मी माझा सर्वश्रेष्ठ दिलं असल्याचे देखील शरथ म्हणाला.