टोकियो -कोरोना महामारीच्या सावटाखाली देखील टोकियो ऑलिम्पिक यशस्वीपणे पार पडलं. टोकियो 2020 इंडिपेंडेंट एक्सपर्ट पॅनलचे अध्यक्ष ब्रायन मॅकक्लोस्की यांनी ऑलिम्पिक संपल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी संपलेल्या ऑलिम्पिकचा निकर्ष पाहता, डब्ल्यूएचओचा सल्ला हा ऐतिहासिक मार्गाने योग्य ठरल्याचे म्हटलं आहे.
मॅकक्लोस्की म्हणाले की, साथीच्या आजारातून बाहेर पडण्याचा एकमात्र मार्ग आरोग्य आणि सामाजिक उपाय लागू करणेच आहे. यात सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सतत हात धुत राहणे, हाच उपाय आहे. यावर जागतिक आरोग्य संघटनेने महामारीच्या सुरूवातीपासून भर दिला.
चाचण्या तसेच ट्रॅक अँड आणि ट्रेस प्रोग्राम हेच डब्ल्यूएचओचे सुरूवातीपासून मत राहिल्याचे देखील मॅकक्लोस्की म्हणाले.
टोकियोत डब्ल्यूएचओच्या सल्ल्यानुसार टोकियोत हाच प्रोग्राम आखण्यात आला. याचे निष्कर्ष पाहता डब्ल्यूएचओचा सल्ला योग्य ठरल्याचे दिसून येतं. मूलभूत उपायांचे पालन आणि चाचणीसह प्रोटोकॉल पाळत साथीच्या आजाराना दूर ठेवता येणे शक्य आहे. हे आम्ही दाखवून दिले असल्याचे मॅकक्लोस्की म्हणाले.