मुंबई - भारताची जिम्नॅस्टिक्स प्रणाती नायकला टोकियो ऑलिम्पिकचा कोटा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स महासंघाने (एफआयजी) याची अधिकृत घोषणा केली.
अशिया चॅम्पियनशीपचे आयोजन मे महिन्यात करण्यात येणार होते. परंतु कोरोनामुळे ही स्पर्धा रद्द करण्यात आली. त्यानंतर प्रणाती रिएलोकेशनच्या आधारावर टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली.
टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्यानंतर प्रणातीचे प्रशिक्षक लखन शर्मा यांनी सांगितलं की, 'प्रणातीला रिएलोटेड कॉन्टिनेंटल कोटा मिळाला आहे. कारण तिने २०१९ मध्ये अशिया चॅम्पियनशीप स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली होती.
२०२० मध्ये अनेक स्पर्धा कोरोनामुळे रद्द करण्यात आल्या होत्या. अशात प्रणालीला ऑलिम्पिक कोटा मिळाल्याची माहिती आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स महासंघाने सोमवारी सायंकाळी दिली असल्याचे देखील शर्मा म्हणाले.