टोकियो - भारताचा अनुभवी टेबल टेनिस स्टार अचंता शरथ कमल याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरूष एकेरीची तिसरी फेरी गाठली आहे. तिसऱ्या फेरीत त्याचा सामना गतविजेत्या खेळाडूंशी होणार आहे.
शरथ कमल याने टोकियो मेट्रोपॉलिटन जीम टेबल नं1 वर झालेल्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात पोर्तुगालच्या टियागो अपोलोनिया याचा पराभव केला.
शरथ कमलचे हे चौथे ऑलिम्पिक आहे. त्याने दुसऱ्या सामना 49 मिनिटात 2-11, 11-8, 11-5, 9-11, 11-6, 11-4 असा जिंकला.
शरथ कमलने पहिला गेम अवघ्या चार मिनिटात 2-11 असा गमावला. त्यानंतर त्याने शानदार वापसी करत पुढील दोन गेम जिंकत 2-1 अशी बढत घेतली. पण टियागोने चौथा गेम जिंकत स्कोर 2-2 केला.