टोकियो - भारताची युवा गोल्फपटू अदिती अशोकला ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचण्यात अपयश आलं. ती महिला वैयक्तिक स्ट्रोक प्ले मध्ये चौथ्या स्थानावर राहिली. अदिती शुक्रवारी तिसऱ्या फेरीत दुसऱ्या स्थानावर होती. यामुळे ती आज चौथ्या फेरीत पदकाची दावेदार म्हणून पुढे आली होती. पण तिला आज आपल्या कामगिरीत सातत्य राखता आलं नाही. यामुळे तिचे पदकाचे स्वप्न भंगले.
स्ट्रोक्स प्लेमध्ये अमेरिकेची नेली कोर्डा हिने सुवर्ण पदक जिंकलं. तर रौप्य आणि कास्य पदकासाठी जपानची मोनी इनामी आणि न्यूझीलंडच्या लेडिया यांच्यात सामना होईल.
तीन फेरीत अदितीची कामगिरी उल्लेखणीय होती. तिने तिसऱ्या फेरी अखेर दुसरे स्थान पटकावले होते. पण आज तिला ही कामगिरी कायम ठेवता आली नाही. ती चौथ्या स्थानी घसरली. जपान आणि न्यूझीलंडच्या गोल्फरनी त्याला मागे टाकलं.
तीन फेरीत अदिती दुसऱ्या स्थानावर
23 वर्षीय अदिती अशोकने गुरूवारी दुसऱ्या फेरीत शानदार कामगिरी केली. तिने 5 बर्डी लगावत 66 चा कार्ड खेळला. पण ती जगातील एक नंबर गोल्फर नेली कोर्डाला मागे टाकू शकली नाही. नेला कोर्डा दुसऱ्या फेरीत 62 च्या जबरदस्त कार्ड खेळत पहिल्या स्थान काबीज केलं. दोन फेरीनंतर तिचा एकूण स्कोर 13 अंडर 129 होता. तर अदितीचा 133 असा होता.