टोकियो -अखेर टोकियो ऑलिम्पिकची प्रतिक्षा संपली आहे. टोकियो ऑलिम्पिकचा उद्धाटन सोहळा सुरू असून यात मेरी कोम आणि भारतीय पुरूष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग यांनी भारतीय पथकाचे नेतृत्व केलं.
उद्धाटन सोहळ्यात ग्रीसने आपल्या राष्ट्रीय ध्वजासह ऑलिम्पिक स्टेडियमध्ये प्रवेश केला. त्यानंतर क्रमाक्रमाने इतर देशाच्या संघानी प्रवेश करत आहेत. पहिल्या दहा क्रमात युएईचा संघ आला. तर ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेया, युक्रेन आणि उरुग्वे त्यानंतर आले. आयोजक समितीने वर्णमालेच्या क्रमानुसार याची निवड केली आहे. भारतीय संघ 21व्या स्थानावर आला. दरम्यान, जपानचे सम्राट नारूहितो यांच्यासोबत आयओसीचे प्रमुख थॉमस बाक हे देखील या उद्धाटन सोहळ्याला उपस्थित आहेत.
टोकियोमध्ये दुसऱ्यांदा होतोय ऑलिम्पिक
1964 मध्ये टोकियोमध्ये ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात आले होते. जपान ऑलिम्पिकचे आयोजन करणारा पहिला आशियाई देश ठरला होता. आता जपान पुन्हा एकदा 2020 ऑलिम्पिकचे यजमानपद भूषवत आहे.