टोकियो - भारतीय पुरूष बॉक्सर सतीश कुमारचे टोकियो ऑलिम्पिकमधील आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. सात टाके पडलेले असताना देखील सतीश कुमार उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळण्यासाठी रिंगमध्ये उतरला. समोर आव्हान होते जगज्जेता आणि आशियाई चॅम्पियन बखोदिर जलोलोव्ह याचे. पण यात सतीश कुमारचा पराभव झाला. उज्बेकिस्तानच्या बॉक्सरने हा सामना 5-0 असा एकतर्फा जिंकला.
पहिल्या राउंडमध्ये पाच पंचानी बखोदिरला प्रत्येकी 10-10 गुण दिले. तर सतीशला 9-9 गुण मिळाले. पण या राउंडमध्ये सतीश कुमार आक्रमक खेळताना पाहायला मिळाला. बखोदिर जगज्जेता आहे. परंतु सतीशने या जगज्जेत्यामसोर पहिल्या रांउडमध्ये मोठं आव्हानं उभारलं होतं.
पहिल्या राउंडमधील खेळ पाहता सतीश दुसऱ्या राउंडमध्ये उलटफेर करेल, अशी आशा होती. परंतु हा राउंडदेखील बखोदिरने जिंकला. या राउंडमध्ये देखील पंचांनी बखोदिरला 10-10 गुण दिले. तर सतीशला 9-9 गुणांवर समाधान मानावे लागले.
तिसऱ्या राउंमध्ये बखोदिरसमोर सतीशचा निभाव लागला नाही. बखोदिरने हा सामना 5-0 ने एकतर्फा जिंकला. दरम्यान, या पराभवासह भारतीय पुरुष बॉक्सरचे टोकियो ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आले. याआधी भारताचे चार बॉक्सरचे आव्हान संपुष्टात आले आहे.