टोकियो - टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला जबर धक्का बसला. पदकाची प्रबळ दावेदार असलेल्या पी. व्ही. सिंधूला उपांत्य फेरीत पराभव पत्कारावा लागला. चीनच्या ताय झू यिंगने सिंधूचा 21-18, 21-12 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. सिंधू आता कांस्य पदकासाठी आणखी एक सामना खेळेल. या सामन्यात तिच्यासमोर चीनच्या ही बिंग जिआओ हिचे आव्हान असणार आहे.
पहिल्या फेरीत सिंधू-झू यिंग यांच्यात कडवी झुंज -
पी. व्ही. सिंधू आणि चीनी तैईपेची खेळाडू ताय झू यिंग यांच्यात पहिल्या सेटमध्ये कडवी झुंज पाहायला मिळाली. सिंधूने यात 12-10 ने पुढे होती. परंतु झू यिंगने जोरदार पुनरागमन करत हा सेट 21-18 असा जिंकला.
दुसऱ्या फेरीत झू यिंगचा बोलबाला -
पहिला सेट गमावल्यानंतर सिंधू दुसऱ्या फेरीत पुनरागमन करेल, अशी आशा होती. परंतु, झू यिंगने सिंधूला पुनरागमनाची संधीच दिली नाही. तिने 11-7 अशी आघाडी घेतली. या दरम्यान, झू यिंगने सिंधूला चूका करण्यास भाग पाडलं. पहिला सेट गमावल्याचा दबाव सिंधूच्या खेळात स्पष्ट जाणवत होता. झू यिंगने दुसऱ्या सेटमध्ये सिंधूचा 21-12 असा पराभव केला.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये सिंधूची कामगिरी -