टोकियो - टोकियो ऑलिम्पिकच्या उद्धाटन सोहळ्यात पाकिस्तानच्या ध्वजवाहकांनी कोरोनाच्या नियमांची पायमल्ली केली. शुक्रवारी जपानच्या नॅशनल स्टेडियममध्ये टोकियो ऑलिम्पिकचा उद्धाटन सोहळा पार पडला. पाकिस्तानचे ध्वजवाहक या सोहळ्यात मास्क तोंडावर व्यवस्थित न लावता परेडमध्ये सहभागी झाले होते.
पाकिस्तान दलाच्या ध्वजवाहकाचा मान बॅडमिंटनपटू महूर शहजाद आणि नेमबाज खलील अख्तर यांना मिळाला होता. परेड दरम्यान, महूरचा मास्क तोंडा खाली तर खलीलची नाक मास्कने व्यवस्थित झाकलेली नव्हती. या दोघांशिवाय पाकचे इतर अॅथलेटिक्स व्यवस्थित मास्क लावलेले पाहायला मिळाले.
दरम्यान, पाकिस्तान शिवाय किर्गीस्तान आणि ताजिकिस्तानचे बहुतांश सदस्य उद्धाटन सोहळ्यात विना मास्क पाहयाला मिळाले.