टोकियो - टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची स्टार नेमबाज मनु भाकरने निराश केले. तिला महिला 10 मीटर एअर पिस्टलच्या पात्रता फेरीत पराभव पत्कारावा लागला. मनु भाकर 600 पैकी 575 गुणांसह 12 व्या स्थानी राहिली. दरम्यान, फायनल फेरीसाठी टॉपचे 8 खेळाडू पात्र ठरतात. मनु भाकरकडून पदकाची आशा होती परंतु तिने निराशा केली.
पात्रात फेरीत मनु भाकरला पिस्तूलने दगा दिला. दुसऱ्या राउंडमध्ये मनुच्या पिस्तूलची इलेक्ट्रॉनिक ट्रिगर सर्किट खराब होती. 19 वर्षीय मनुला तेव्हा प्रशिक्षक आणि जूरीच्या एका सदस्यासह टेस्ट टेंटमध्ये जावं लागलं. जिथे ही पिस्तूल बदलण्यात आली.
ही सर्व प्रक्रिया मनु भाकरला चांगलीच महागात पडली आणि तिला 575 गुणांवर समाधान मानावे लागले. यादरम्यान मनुने पाचव्या राउंडमध्ये शानदार वापसी देखील केली होती. तिने यात 95 गुण घेतले होते. परंतु पिस्तूलमध्ये गडबड झाली आणि ती 5 मिनिटे शुटिंग करू शकली नाही.
मनु भाकर शिवाय भारताची दुसरी नेमबाज यशस्विनी सिंह देसवाल हिला देखील फायलनमध्ये प्रवेश करताला आला नाही. ती 574 गुणासंह 14व्या स्थानावर राहिली. या यादीत चीनची नेमबाज जियान रानसिंग पहिल्या स्थानावर राहिली. तिने 587 गुण मिळवले. तर यूनानची अन्ना आणि रुसची बी वितालिना अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या.