महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Tokyo Olympics : आज दिवसभरातील भारतीय खेळाडूंच्या सामन्यांचे निकाल, जाणून घ्या एका क्लिकवर - टोकियो ऑलिम्पिक अपडेट

tokyo-olympics-2020-live-updates-day-8-india-at-olympics-in-marathi-latest-news
Live Tokyo Olympics : पी. व्ही. सिंधूने पहिला सेट जिंकला

By

Published : Jul 30, 2021, 9:04 AM IST

Updated : Jul 30, 2021, 5:17 PM IST

17:14 July 30

भारतीय हॉकी संघाचा जपानवर 5-3 ने विजय

हॉकी - भारतीय पुरूष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये जपानचा 5-3 ने पराभव केला. भारताचा या स्पर्धेतील हा चौथा विजय आहे. या विजयासह भारताने उपांत्यपूर्व फेरीची दावेदारी मजबूत केली.  

14:55 July 30

पी. व्ही. सिंधू उपांत्य फेरीत

बॅडमिंटन - पी. व्ही. सिंधू उपांत्य फेरीत पोहोचली आहे. तिने उपांत्यपूर्व सामन्यात जपानच्या यामागुची हिचा 21-13, 22-20 ने पराभव केला. 

11:39 July 30

दीपिका कुमारीचे ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात

तिरंदाजी - भारतीय महिला तिरंदाज दीपिका कुमारीचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. कोरियाची अव्वल तिरंदाज अॅन सॅन हिने तिचा पराभव केला.  

10:53 July 30

भारतीय महिला हॉकी संघाचा आयर्लंडवर विजय

हॉकी - भारतीय महिला हॉकी संघाने आयर्लंडचा 1-0 ने पराभव केला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाचा हा पहिला विजय आहे. याआधी भारताने सलग तीन सामने गमावले आहेत.  

09:55 July 30

अॅथलेटिक्स - भारताची महिला धावपटू द्युती चंदला सेमीफायनल गाठण्यास अपयश आलं. द्युती 100 मीटर हीट्स राउंडमध्ये 11.54 सेकंदाच्या वेळेसह सहाव्या स्थानावर राहिली. 

09:12 July 30

बॉक्सिंग - लवलिना उपांत्य फेरीत, तिने उपांत्यपूर्व फेरीतील सामना 4-1 ने जिंकला.  

09:12 July 30

अॅथलेटिक्स: ४०० मीटर अडथळा शर्यत हिटमध्ये भारताच्या एम पी जाबीर याला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. 

09:11 July 30

बॉक्सिंग : ६० किलो गटाच्या उपउपांत्यपूर्व फेरीत भारताच्या सिमरनजिंत कौरचा पराभव झाला. थायलंड सुदापोर्न सिसोंदीने कौरचा ५-० असा पराभव केला. 

09:11 July 30

नेमबाजी: महिला २५ मीटर पिस्तूल पात्रता फेरीत मनू भाकर आणि राही सरनोबत अपयशी ठरल्या. त्यांना अंतिम फेरी गाठता आली नाही. 

09:11 July 30

अॅथलेटिक्स: ३००० मीटर स्टिपलचेस हिटमध्ये अविनाश साबळेला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. 

09:10 July 30

नेमबाजी: महिला २५ मीटर पिस्तूलच्या अंतिम फेरीत पोहोचण्यास राही सरनोबतला अपयश आलं आहे. 

08:57 July 30

टोकियो - टोकियो ऑलिम्पिकचा आज आठवा दिवस आहे. आज भारतीय खेळाडूंचे शूटिंग, अॅथलेटिक्स, तिरंदाजी, बॉक्सिंग यांच्यासह भारतीय पुरूष आणि महिला हॉकी संघाचा सामना होणार आहेत.  

Last Updated : Jul 30, 2021, 5:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details