टोकियो -संपूर्ण जगासाठी हा काळ खूप कठिण आहे. कारण प्रत्येक जण कोरोनाविरोधात लढत आहे. कोरोनामुळे लाखो लोकांचा जीव गेला आहे. अशा या जीवघेण्या महामारीत एक अॅथलेटिक्स सराव सोडून कोरोना रुग्णांची सेवा करत होता. या अॅथलेटिक्सने आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.
इराणचा नेमबाज जावेद फोरौघी याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्णपदक जिंकलं आहे. सुवर्णपदक विजेता जावेद स्वत:ला देशाचा सैनिक मानतो. कोरोना महामारीत इतर नेमबाज टोकियो ऑलिम्पिकचा सराव करत होते. तेव्हा जावेद कोरोनाग्रस्त असलेल्या रुग्णांची सेवा करत होता.
इराण पहिला चॅम्पियन जावेद