मुंबई - हनिमून हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक हळवं वळण असतं, असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण एक जोडप्याने आपला हनिमून पुढे ढकलत टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. होय हे खरं आहे.
युक्रेनची महिला टेनिसपटू एलिना स्वितोलीना आणि फ्रान्सचा टेनिसपटू गेल मोनाफिल्ड यांनी नुकतेच लग्न केलं आहे. पंरतु त्यांनी आपला हनिमून पुढे ढकलत टोकियो गाठलं आहे. ते आपल्या देशाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी टोकियोमध्ये दाखल झाले आहेत.
एलिना म्हणाली, आम्हाला एका वर्षात अनेक स्पर्धा खेळण्याची सवय आहे. त्यामुळे आम्हाला आराम करायला सद्या वेळ नाही. आमचे सगळे लक्ष्य हे ऑलिम्पिककडे आहे. हनिमूनबाबत आम्ही नोव्हेंबरमध्ये विचार करू. सद्या आम्ही जोरदार सराव करण्यास प्राधान्य देत आहोत.
दरम्यान, एलिना स्वितोलीना आणि गेल मोनाफिल्ड हे दोघेही एकेरी आणि डबल्समध्ये खेळणार आहेत. आज टोकियो ऑलिम्पिकचे उद्धाटन होणार आहे. उद्धाटनाआधीपासूनच विविध क्रीडा प्रकारासाठी स्पर्धांना सुरूवात झाली आहे.
स्वत:च घालावं लागेल पदक -
टोकियो ऑलिम्पिकमध्ये विजयी अॅथलेटिक्सना स्वत:चे पदक स्वत:च घालावे लागणार आहे. याशिवाय अॅथलेटिक्स त्या पदकाचं चुंबन देखील घेऊ शकणार नाहीत. तसेच अॅथलेटिक्सना मंचावर मास्क घालणे अनिर्वाय आहे. ऑलिम्पिकमध्ये कोरोनाच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी सतर्कता बाळगली जात आहे.
विनाप्रेक्षक होणार टोकियो ऑलिम्पिक -