टोकियो - मागील वर्षी कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या टोकियो ऑलिम्पिकला आजपासून सुरूवात होत आहे. ऑलिम्पिकमध्ये 204 देशांचे 11 हजारांहून अधिक अॅथलेटिक्स पदकासाठी आपली दावेदारी सादर करणार आहेत. यंदा भारताचे 127 अॅथलेटिक्स ऑलिम्पिकमधील 18 क्रीडा प्रकारात भाग घेणार आहेत. भारताची टोकियो ऑलिम्पिकमध्ये आर्चरी म्हणजे तिरंदाजी खेळाने सुरूवात झाली. पहिल्या दिवशी युमेनोशिमा पार्कमध्ये झालेल्या सामन्यात, भारताची स्टार महिला तिरंदाज दीपिका कुमारी सिंगल रिकर्व रॅकिंग राउंडमध्ये नवव्या स्थानावर राहिली. दरम्यान, दीपिका कुमारीची ही कामगिरी निराशजनक म्हणता येईल.
दीपिका कुमारीने मिळवले इतके गुण
जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या दीपिका कुमारीने 663 गुण घेतले. पहिल्या हाफमध्ये 334 तर दुसऱ्या हाफमध्ये तिने 329 इतके गुण मिळवले. तिने 72 संधीमध्ये 30 वेळा परफेक्ट 10 गुण घेतले.
कोरियाच्या तिरंदाजांचा दबदबा -
टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिल्या दिवशी कोरियाच्या तिरंदाजांचा दबदबा राहिला. पहिल्यी तीन स्थानावर कोरियन तिरंदाजांनी बाजी मारली. यात 20 वर्षीय अन सान 680 गुणांसह पहिल्या स्थानावर राहिली. हा ऑलिम्पिकमधील एक रेकॉर्ड बनला आहे. याआधी तिरंदाजाला 673 स्कोर करता आला होता. विश्व रेकॉर्ड कांग चेइ वोंग हिच्या नावे असून तिने 692 गुण घेतले होते. जांग मिनही 677 गुणांसह दुसऱ्या तर कांग चेइ वोगंग 675 गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिली.
दीपिका कुमारीचा भूटानच्या कर्माशी होणार सामना