टोकियो - भारताचा अविनाश साबळे याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 3000 मीटर स्टिपलचेस स्पर्धेत नॅशनल विक्रम प्रस्तापित केला. परंतु तो टोकियो ऑलिम्पिकची दुसरी फेरी गाठण्यास अपयशी ठरला.
अविनाश साबळे याने 8:18.12 वेळ घेतला. मार्चमध्ये फेडरेशन कपमध्ये त्याने 8: 20.20 इतका वेळ घेत नॅशनल विक्रम नोंदवला होता. ऑलिम्पिकमध्ये त्याने आपलाच हा विक्रम मोडीत काढला. दुसऱ्या हीटमध्ये तो सातव्या स्थानी राहिला. दरम्यान, प्रत्येक हीटमधील अव्वल 3 आणि संपूर्ण हीटमधील अव्वल सहा खेळाडू फायनलसाठी पात्र ठरतात.