Tokyo Olympics : भालाफेकपटू शिवपाल सिंहचे ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात
भारतीय भालाफेकपटू शिवपाल सिंह ग्रुप बी मध्ये क्वालिफिकेशनच्या तीन प्रयत्नात फायनलमध्ये क्वालिफाय करण्यात अपयशी ठरला.
Tokyo Olympics : भालाफेकपटू शिवपाल सिंहचे ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात
By
Published : Aug 4, 2021, 9:42 AM IST
टोकियो -भारतीय भालाफेकपटू शिवपाल सिंह ग्रुप बी मध्ये क्वालिफिकेशनच्या तीन प्रयत्नात फायनलमध्ये क्वालिफाय करण्यात अपयशी ठरला. यासह त्याचे टोकियो ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आले.
शिवपालने पहिल्या प्रयत्नात 76.40 मीटर लांब भाला फेकला. तर दुसऱ्या प्रयत्नात त्याने 74.80 इतके अंतर पार केले. अखेरच्या तिसऱ्या प्रयत्नात तो 74. 81 मीटर लांब भाला फेकू शकला. यात त्याचा सर्वोत्तम 76.40 हा होता. जे अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्यासाठी पुरेशा ठरला नाही.
भारतीय पुरुष भालाफेक खेळाडू नीरज चोप्राने जबरदस्त प्रदर्शन करत पहिल्याच प्रयत्नात ऑलिम्पिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्याने 86.65 मीटरचे अंतर पूर्ण केले.
या खेळात प्रत्येक खेळाडूला तीन संधी दिल्या जातात. यात सर्वोत्तम प्रयत्नाच्या बळावर खेळाडूला गुण दिले जातात. अर्थात अजून हा पहिलाच राऊंड आहे. यात 16 खेळाडू खेळत आहेत. अंतिम फेरीत पात्र होण्यासाठी पुरुष खेळाडूला 83 मीटरचे अंतर पूर्ण करणे गरजेचे होते. नीरज ने आपल्या पहिल्याच प्रयत्नात 86.65 मीटरचे अंतर पूर्ण केले. तर यासोबतच आणखी एक ग्रुप आहे. यात 15 खेळाडू 83 मीटरचे अंतर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. हे दोन्ही पात्रता फेरी झाल्यानंतर प्रदर्शनाच्या आधारावर सर्वांना गुण दिले जातील आणि टॉप 12 खेळाडू पुढच्या फेरीसाठी पात्र ठरतील.