टोकियो -टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष कुस्तीपटूंची विजयी घौडदौड सुरू आहे. भारताचा कुस्तीपटू रवी कुमार दहिया 57 किलो वजनी गटात उपांत्य फेरीत पोहोचला आहे. रवी कुमारनंतर दीपक पुनिया देखील उपांत्य फेरीत दाखल झाला आहे.
उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात रवी कुमार दहियाचा सामना बुल्गेरियाच्या जॉर्जी वेलेंटिनोव्ह याच्याशी झाला. रवी दहिया याने हा सामना एकतर्फा जिंकला. रवी दहियाने बुल्गेरियाच्या कुस्तीपटूला 14-4 अशी सहज मात दिली.
रवी कुमार दहियाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये विजयी सुरूवात केली. त्याने 57 किलो वजनी गटात कोलंबियाच्या ऑस्कर टिगरेसोस उरबानो याचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. रवी कुमार दहिया याने हा सामना 13-2 अशा फरकाने जिंकला होता.
पहिल्या दोन मिनिटामध्ये दोन्ही कुस्तीपटूंमध्ये चांगली लढत पाहायला मिळली. रवी दहियाने दोन गुण घेतले. तर उरबानो याने रिवर्स टेकडाउनच्या माध्यमातून गुणांची कमाई केली. यानंतर रवी दहियाने शानदार वापसी करत दुसऱ्या पीरियडमध्ये एकूण 10 गुण घेतले.
रवी कुमार दहिया याने जागतिक कुस्ती चॅम्पियनशीप स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीचा सामना जिंकत टोकियो ऑलिम्पिकचा कोटा मिळवला होता. रवीने उपांत्यपूर्व फेरीत माजी विश्व विजेता आणि 2017 चा आशियाई चॅम्पियन जपानचा यूकी ताकाहाशी यांचा पराभव केला. रवीने हा सामना 6-1 ने जिंकत उपांत्य फेरी गाठली होती. पण त्याला उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का बसला.
हेही वाचा -Tokyo Olympics : कुस्तीपटू दीपक पुनिया उपांत्य फेरीत
हेही वाचा -टोकियो ऑलिम्पिक 2020 : भारताचा नीरज चोप्रा अंतिम फेरीत; पुरुष भालाफेकमध्ये पहिल्या प्रयत्नात पात्र