टोकियो -भारतीय कुस्तीपटू दीपक पुनियाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये शानदार सुरूवात केली. त्याने पहिल्या सामन्यात नायजेरियाच्या कुस्तीपटूला चितपट करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. दीपकने हा सामना 12-1 अशा फरकाने एकतर्फा जिंकला. दरम्यान, दीपक पुनिया 86 किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व करत आहे.
86 किलो वजनी गटाच्या उपउपांत्यपूर्व फेरीत दीपक पुनियाचा सामना नायजेरियाच्या एकरेकेम एगियोमोर याच्याशी झाला. या सामन्यात दीपक पुनियाने नायजेरियाच्या कुस्तीपटूरवर संपूर्ण वर्चस्व राखले. त्याने पहिला राउंडमध्ये 4 तर दुसऱ्या राउंडमध्ये 8 गुण घेतले. हा सामना दीपक पुनियाने एकतर्फा जिंकला.
रवी कुमार दाहिया उपांत्यपूर्व फेरीत...
कुस्तीपटू रवी कुमार दाहियाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये विजयी सुरूवात केली. 57 किलो वजनी गटात रवी कुमार दाहिया याने कोलंबियाच्या ऑस्कर टिगरेसोस उरबानो याचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. रवी कुमार दाहिया याने हा सामना 13-2 अशा फरकाने जिंकला.
पहिल्या दोन मिनिटामध्ये दोन्ही कुस्तीपटूंमध्ये चांगली लढत पाहायला मिळली. रवी दाहियाने दोन गुण घेतले. तर उरबानो याने रिवर्स टेकडाउनच्या माध्यमातून गुणांची कमाई केली. यानंतर रवी दाहियाने शानदार वापसी करत दुसऱ्या पीरियडमध्ये एकूण 10 गुण घेतले.
हेही वाचा -स्वांतत्र्यदिनाचा लाल किल्ल्यावरील कार्यक्रम असणार खास, मोदींनी दिलं खास पाहुण्यांना आमंत्रण
हेही वाचा -Tokyo Olympics : कुस्तीपटू रवी कुमार दाहिया उपांत्यपूर्व फेरीत