टोकियो - भारतीय तलवारबाज सीए भवानी देवीचे टोकियो ऑलिम्पिकमधील आव्हान राउंड 32 मध्ये संपूष्टात आले. परंतु तिने पहिला सामना जिंकत इतिहास रचला.
सीए भवानी देवी टोकियो ऑलिम्पिकमध्ये तलवारबाजीत भारताचे प्रतिनिधित्व करणारी एकमेव खेळाडू आहे. तिने महिला एकेरी गटात विजयी सुरुवात केली. भवानी देवीने ट्युनिशियाच्या नादिया बेन अजिजीचा १५-३ ने धुव्वा उडवला. विशेष म्हणजे भवानी देवीने हा फक्त सहा मिनिटे १४ सेकंदामध्ये जिंकला.
दरम्यान, भवानी देवीचे हे पहिलं ऑलिम्पिक आहे. तलवारबाजी या खेळात ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली ती भारताची पहिली खेळाडू आहे.
भवानी देवीने नादियाचा असा उडवला धुव्वा -
भवानी देवी एफआयई रँकिंगमध्ये ४२ स्थानावर आहे. तर नादियाचे ३८४ वे स्थान आहे. भवानी देवीचा सामना नादियाशी झाला. तेव्हा भवानी देवीने पहिल्या हाफमध्ये सलग 8 पॉईंट्स मिळवले. यामुळे नादिया बॅकफूटवर गेली. तिला दुसऱ्या हाफमध्ये पुनरागमन करता आलं नाही. भवानीच्या झंझावतीसमोर नादियाने गुडघे टेकले. अखेरीस भवानी देवीने हा सामना 15-3 असा जिंकला.
भवानी देवीचे ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात -
एफआयई रँकिंगमध्ये तिसऱ्या स्थानावर असलेल्या फ्रान्सच्या मॅनॉन ब्रुनेटने भवानी देवीचे टोकियो ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आणले. राउंड 32 च्या सामन्यात मॅनॉन हिने भवानी देवीचा 15-7 असा पराभव केला. भवानीने या सामन्यात मॅनॉनला कडवी झुंज दिली. परंतु मॅनॉनने आपला अनुभव पणाला लावत सामना आपल्या नावे केला.
हेही वाचा -Tokyo Olympics: नौकानयनमध्ये भारताच्या पदकाच्या वाढल्या; भारतीय जोडी उपांत्य फेरीत
हेही वाचा -Tokyo Olympics: टोकियो ऑलिम्पिकमध्ये वाद; मनिका बत्राने नाकारला प्रशिक्षकाचा सल्ला