महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

कोण आहे कमलप्रीत कौर; जिच्यामुळे टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पदकाच्या आशा वाढल्या - टोकियो ऑलिम्पिक

टोकियो ऑलिलिम्पिकमध्ये थाळीफेक खेळात भारतीय कमलप्रीत कौरने दमदार कामगिरी करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. तिने डिस्कस थ्रोमध्ये अंतिम फेरी गाठली आहे.

tokyo-olympic-who-is-kamalpreet-kaur-india-discus-throw-sensation-enters-in-final
कोण आहे कमलप्रीत कौर; जिच्यामुळे टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पदकाच्या आशा वाढल्या

By

Published : Jul 31, 2021, 10:07 AM IST

टोकियो - टोकियो ऑलिलिम्पिकमध्ये थाळीफेक खेळात भारतीय कमलप्रीत कौरने दमदार कामगिरी करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. तिने डिस्कस थ्रोमध्ये अंतिम फेरी गाठली आहे. कमलप्रीतने तिसऱ्या प्रयत्नात ६३.९७ मीटर लांब थाळी फेकत अंतिम फेरीत धडक दिली. कमलप्रीतने अंतिम फेरीत जर अशीच कामगिरी नोंदवली तर ती अॅथलेटिकमध्ये पदक जिंकणारी भारताची पहिली महिला खेळाडू ठरेल. कमलप्रीत कौरने भारताच्या पदकाच्या आशा वाढवल्या आहेत. कमलप्रीत राष्ट्रीय विक्रमवीर आहे.

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आज कमलप्रीत कौर हिने पहिल्या प्रयत्नात ६०.२९ मीटर, दुसऱ्या प्रयत्नात ६३.९७ मीटर आणि तिसऱ्या प्रयत्नात पुन्हा ६३.९७ मीटर अशी कामगिरी नोंदवली. यासह ती अंतिम फेरीसाठी पात्र ठरली. दुसरीकडे भारताची स्टार थाळीफेकटू सीमा पुनिया ग्रुप बी मध्ये 6 व्या तर एकूण क्रमवारीत सोळाव्या स्थानावर राहिली. यामुळे ती अंतिम फेरीसाठी पात्र ठरली नाही. दरम्यान, पहिल्या 12 जणांना अंतिम फेरीसाठी स्थान मिळते.

कोण आहे कमलप्रीत कौर -

कमलप्रीत कौर ही पंजाबच्या श्री मुख्तसर साहिब जिल्ह्याच्या बादल गावची रहिवाशी आहे. ती अभ्यासात ती तेवढी पुढे नव्हती. पण खेळात ती अव्वल असे. तेव्हा प्रशिक्षकाने तिला राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घेण्याचा सल्ला दिला. या स्पर्धेत ती पदक जिंकू शकली नाही. परंतु तिने चौथे स्थान मिळवले. कमलप्रीत कौरने 2014 सालामध्ये खेळाला गाभिर्याने घेतलं. तिने सुरूवातीला साई केंद्रात सरावाला सुरूवात केली. तिची ही मेहनत यशस्वी ठरली आणि ती अंडर 18 आणि अंडर 20 ची राष्ट्रीय चॅम्पियन ठरली.

कमलप्रीतच्या नावे राष्ट्रीय विक्रम

वर्ष 2019 मध्ये आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत कमलप्रीत कौर पाचव्या स्थानावर राहिली. परंतु तिने डिस्कस थ्रोमध्ये 65 मीटर लांब थाळी फेकत राष्ट्रीय विक्रम नोंदवला. अशी कामगिरी करणारी ती भारताची पहिली महिला खेळाडू ठरली. तिने 2019 मध्ये 60.25 मीटर लांब थाळी फेकत सुवर्ण पदक जिंकल होतं.

हेही वाचा -Tokyo Olympics : भारतीय थाळीफेकपटू कमलप्रीत कौरचा अंतिम फेरीत झोकात प्रवेश!

हेही वाचा -टोकियो ऑलिम्पिक : भारतीय पुरुष हॉकी संघाची जपानवर 5-3 ने मात

ABOUT THE AUTHOR

...view details