टोकियो - टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरूष उंच उडीच्या अंतिम सामन्यादरम्यान, एक अद्धभूत घटना घडली. जिची चर्चा संपूर्ण जगात होत आहे. ऑलिम्पिकसह सर्व खेळात ज्याचे प्रदर्शन सर्वात चांगले असते, त्या खेळाडूला सुवर्ण पदक दिलं जातं. पण टोकियो असं घडलं नाही. उंच उडीत कतारच्या 30 वर्षीय मुताज इस्सा बर्सिम आणि इटलीच्या 29 वर्षीय जियान मारको ताम्बरी संयुक्त सुवर्ण पदक विजेते ठरले. कतारच्या अॅथलिटने ही बाब संभव करून दाखवली.
काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घ्या...
उंच उडीच्या अंतिम फेरीत दोन्ही खेळाडू 2.37 मीटरसह बरोबरीत होते. नियमानुसार अशा स्थितीत जम्प ऑफ केलं जातं. यात प्रत्येक अॅथलिट अधिकाऱ्यांनी निश्चित केलेल्या उंचीवर उडी मारतो. याआधारावर विजेता ठरतो.
नियमाप्रमाणे याचे पालन केलं जाणार होते. तेव्हा कतारचा अॅथलिट बर्शिम याने असा निर्णय घेतला की, ज्याचे जगभरातून कौतूक होत आहे. क्रीडा अधिकाऱ्यांनी जेव्हा जम्प ऑफबद्दल बर्शिमला सांगितलं. तेव्हा त्याने, काय आम्ही सुवर्ण शेअर करु शकतो का? असे अधिकाऱ्यांना विचारलं.