महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 20, 2019, 12:22 PM IST

ETV Bharat / sports

टोकियो ऑलिम्पिकसाठीच्या मॅरेथॉन कोर्सचे झाले उद्घाटन

पुढील वर्षी ८ ऑगस्ट रोजी महिलांची मॅरेथॉन होईल त्यानंतर, दुसर्‍या दिवशी पुरुषांची मॅरेथॉन घेण्यात येईल. पुरुष आणि महिलांसाठी मॅरेथॉनची सुरुवात सपोरोच्या ओडोरी पार्क येथून होईल.

Tokyo Olympic marathon course inaugurated
टोकियो ऑलिम्पिकसाठीच्या मॅरेथॉन कोर्सचे झाले उद्घाटन

टोकियो -पुढील वर्षी जपानच्या राजधानीत होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठीच्या मॅरेथॉन कोर्सचे उद्घाटन झाले. ऑलिम्पिकच्या आयोजन समितीने गुरुवारी मॅरेथॉन कोर्सचे उद्घाटन केले. महिनाभरापूर्वी राजधानीतील उष्णतेमुळे हा कार्यक्रम टोकियोहून सपोरो येथे हलवण्यात आला होता. त्यामुळे या उद्घाटनाला उशीर झाला होता.

हेही वाचा -पंजाबचे 'किंग्स इलेवन' खेळणार के. एल. राहुलच्या नेतृत्वात

पुढील वर्षी ८ ऑगस्ट रोजी महिलांची मॅरेथॉन होईल त्यानंतर, दुसर्‍या दिवशी पुरुषांची मॅरेथॉन घेण्यात येईल. पुरुष आणि महिलांसाठी मॅरेथॉनची सुरुवात सपोरोच्या ओडोरी पार्क येथून होईल.

या मॅरेथॉनमध्ये तीन लूप असतील. सर्वात मोठी लूप अर्ध्या मॅरेथॉनच्या बरोबरीची असेल. तर, दुसरी लूप १० किलोमीटरची असेल, जी दोन वेळा पूर्ण करावी लागेल.

ABOUT THE AUTHOR

...view details