नवी दिल्ली - प्रतिष्ठित मानली जाणारी ऑलिम्पिक 'मशाल रिले'ची सुरुवात २५ मार्च २०२१ रोजी फुकुशिमा द्वीपकल्पातील जे व्हिलेज प्रशिक्षण केंद्रापासून होणार आहे. ही मशाल १२१ दिवस जपानमधील सर्व ४७ प्रांतांमधून प्रवास करेल. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) ही घोषणा केली.
ही मशाल ९ जुलै रोजी टोकियोच्या ऑलिम्पिक स्टेडियमवर दाखल होईल आणि २३ जुलै रोजी उद्घाटन सोहळ्यासाठी ठेवली जाईल. टोकियो ऑलिम्पिक व पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी या 'मशाल रिले'च्या मार्गात आणि वेळापत्रकात कोणताही बदल केला जाणार नाही, असे आयओसीने म्हटले आहे.