टोकियो - टोकियो ऑलिम्पिकमध्ये आठव्या दिवशी भारताचे आणखी एक पदक निश्चित झालं आहे. भारताची स्टार महिला बॉक्सर लवलिना बोर्गोहेन उपांत्य फेरीत पोहोचली आहे. तिने उपांत्यपूर्व फेरीत चीनी तैपईच्या चिन चेन नियान हिचा 4-1 ने पराभव केला.
लवलिना 69 किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. तिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये शानदार कामगिरी नोंदवली. लवलिनाचा पहिला सामना जर्मनीच्या नाडिना अप्टेज हिच्याशी झाला. तिने हा सामना 3-2 ने जिंकला. यात पाच पंचानी तिला अनुक्रमे 28, 29, 30, 30, 27 गुण दिले. दुसरीकडे नाडिनाला 29, 28, 27, 27, 30 गुण मिळाले.
उपांत्य फेरीत लवलिनाची गाठ चीन तैपईच्या चिन चेन नियान हिच्याशी झाला. चीन चेन माजी माजी जगज्जेती आहे. पण लवलिनाने या सामन्यात चीनच्या खेळाडूला जोरदार पंच मारले आणि सामना 4-1 असा एकतर्फा जिंकला. लवलिनाची उपांत्य फेरीत गाठ 2019 च्या विश्वविजेत्या टर्कीच्या अॅना लिसेन्को हिच्याशी होईल.
लवलिना पदक जिंकणारी भारताची दुसरी महिला बॉक्सर -