टोकियो - भारताने टोकियो ऑलिम्पिकमधील प्रवासाला सुरूवात केली असून पहिल्या दिवशी महिला आणि पुरूष तिरंदाजांचे सामने झाले. पुरूष सिंगल रॅकिंग राउंडमध्ये अतनु दास, साताऱ्याचा मराठमोळा प्रविण जाधव आणि तरुणदीप यांनी सुरूवात केली. तर दुसरीकडे महिला सिंगल रॅकिंग राउंडमध्ये दीपिका कुमारी नवव्या स्थानावर राहिली.
प्रविण जाधव 'या' स्थानावर
पुरूष तिरंदाजीत सर्वात चांगली रॅकिंग प्रविण जाधवने मिळवली. त्याने 656 गुणांसह 31वे स्थान पटकावले. तर अतनु दासने 653 गुणांसह 35वे स्थान मिळवले. तरुणदीप 652 गुणांसह 37व्या स्थानावर राहिला. दरम्यान, भारतीय तिरंदाजाची ही कामगिरी निराजशनक अशी असल्याचे म्हणता येईल.
रॅकिंग राउंडमध्ये क्रमवारी ठरते -
रॅकिंग राउंडमधील कामगिरीनुसार, क्रमवारी तसेच विरोधी खेळाडू ठरतो. तिरंदाजांना 70 मीटरच्या अंतरावरुन निशाना लावावा लागतो. यात त्यांना 72 तीर दिले जातात.
महिलांमध्ये कोरियाच्या तिरंदाजांचा दबदबा -
टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिल्या दिवशी महिलांमध्ये कोरियाच्या तिरंदाजांचा दबदबा राहिला. पहिल्या तीन स्थानावर कोरियन तिरंदाजांनी बाजी मारली. यात 20 वर्षीय अन सान 680 गुणांसह पहिल्या स्थानावर राहिली. हा ऑलिम्पिकमधील एक रेकॉर्ड बनला आहे. याआधी तिरंदाजाला 673 स्कोर करता आला होता. विश्व रेकॉर्ड कांग चेइ वोंग हिच्या नावे असून तिने 692 गुण घेतले होते. जांग मिनही 677 गुणांसह दुसऱ्या तर कांग चेइ वोगंग 675 गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिली.
प्रविण जाधवबद्दल...
प्रविण जाधव सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सरडे या गावचा आहे. तो प्रथमच ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. प्रविणला लहानपणापासून तिरंदाजाची आवड होती. त्याने वयाच्या 12 व्या वर्षांपासून तिरंदाजी करण्यास सुरूवात केली. त्याने क्रीडा प्रबोधनीमधून औरंगाबादनंतर पुणे आणि दिल्ली या ठिकाणी तिरंदाजीचे प्रशिक्षण घेतले आहे. प्रविणची घरची परिस्थिती बेताची असून तिची आई शेतमजूर तर वडिल सेंटरिंगचे काम करतात.
हेही वाचा -Tokyo Olympics : दीपिका कुमारी रँकिंग राउंडमध्ये 9व्या स्थानी; कोरियन तिरंदाजांचा दबदबा
हेही वाचा -टोकियो ऑलिम्पिक 2020 : एक नजर भारताच्या तयारीवर