महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Tokyo olympic : अविश्वसणीय! सुवर्ण पदक जिंकण्यासाठी शार्लोट वर्थिंग्टनचा 360 डिग्री बॅकफ्लिप - सुवर्ण पदक

ग्रेट ब्रिटनची सायकलपटू शार्लोट वर्थिंग्टन हिने 360 डिग्री बॅकफ्लिप मारत सुवर्ण पदक जिंकलं. ती बॅकफ्लिप मारणारी पहिली महिला सायकलपटू ठरली. तिने 97.50 गुण घेत सर्वांना मागे टाकलं. विशेष म्हणजे शार्लोटचे हे पहिलंच ऑलिम्पिक आहे.

tokyo-olympic-2020-charlotte-worthington-wins-first-ever-gold-medal-in-bmx-freestyle
Tokyo olympic : सुवर्ण पदक जिंकण्यासाठी शार्लोट वर्थिंग्टनचा 360 डिग्री बॅकफ्लिप

By

Published : Aug 1, 2021, 1:18 PM IST

टोकियो - ग्रेट ब्रिटनची सायकलपटू शार्लोट वर्थिंग्टन हिने आज रविवारी टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला. शार्लोटने सर्वांना आश्चर्यचकित करत महिला बीएमएक्स फ्री स्टाइल सायकलिंगमध्ये सुवर्णपदक जिंकलं. शार्लोटने 360 डिग्री बॅकफ्लिप मारत हे सुवर्ण जिंकलं. ती बॅकफ्लिप मारणारी पहिली महिला सायकलपटू ठरली. तिने 97.50 गुण घेत सर्वांना मागे टाकलं. विशेष म्हणजे शार्लोटचे हे पहिलंच ऑलिम्पिक आहे.

शार्लोट वर्थिग्टनला पहिल्या फेरीत दुखापत झाली. तरी देखील तिने 97.50 गुणांसह लीडरबोर्डवर टॉप गाठण्यास अनेक ट्रिक्स आजमावले. दरम्यान, या खेळात अमेरिकेची हैना रॉबर्ट्स फेवरेट मानली जात होती. पण शार्लोटने सुवर्ण पदक जिंकत रॉबर्ट्स धक्का दिला. रॉबर्टस रौप्य पदकाची मानकरी ठरली.

दुखापत झाल्यानंतरही ती बाहेर गेली नाही

25 वर्षीय शार्लोट 360 डिग्री बॅकफ्लिप मारण्याच्या प्रयत्नात दुखापतग्रस्त झाली. तरी देखील तिने मैदान सोडलं नाही. तिच्या चेहऱ्यावर हास्य होतं. तिला आत्मविश्वास होती की, आपण दुसऱ्या प्रयत्नात आवश्यक गुण घेऊ आणि सुवर्ण पदक जिंकू. दुसऱ्या प्रयत्नात तिला 97.50 गुण मिळाले, जे की सुवर्ण पदक जिंकण्यासाठी मुबलक ठरले.

अमेरिकी रॉबर्ट्सने पहिल्या रनमध्ये 96.10 गुण घेतले. तिला वाटलं की हे गुण सुवर्ण पदकासाठी पुरेसे ठरतील. तिने निश्चित होत सायकल खाली ठेवली. परंतु तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. स्वित्झर्लंडची निकिता डूक्रोझ 89.20 गुणांसह कांस्य पदकाची विजेती ठरली.

हेही वाचा -Tokyo Olympics: ऑलिम्पिकमध्ये 7 पदकं जिंकणारी पहिली महिला खेळाडू ठरली इम्मा मॅकेन

हेही वाचा -Tokyo Olympics : नोवाक जोकोव्हिचचा संताप; रागाच्या भरात तोडलं रॅकेट, पाहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details