मुंबई - टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची महिला बॉक्सर लवलिना बोर्गोहेन हिला सुवर्ण पदकाने हुलकावणी दिली. तिला कास्य पदकावर समाधान मानावे लागले. यानंतर लवलिना याने, जे केलं ते मिटून गेलं आहे आणि आता आगामी पॅरिस 2024 ऑलिम्पिकसाठी नव्याने सुरूवात करणार असल्याचे सांगितलं आहे. पीटीआयशी बोलताना तिने ही माहिती दिली.
आसामच्या गोलाघाट जिल्ह्यातील बरोमुखिया येथील 23 वर्षीय लवलिना ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी भारताची तिसरी बॉक्सर ठरली. तिच्याआधी सहावेळची जगज्जेती एमसी मेरी कोम आणि विजेंदर सिंग यांनी हा कारनामा केला आहे. लवलिना या कामगिरीसह दिग्गजांच्या पंक्तित स्थान मिळवलं आहे.
लवलिना म्हणाली, माझं पहिलं त्याग हे आहे की, मी मागील आठ वर्षांपासून घरापासून लांब राहत आहे. कुटूंब अडचणीत असताना मला लांब राहून पाहायचं नव्हतं. हे माझं सर्वात मोठा त्याग आहे.
मी फास्ट फूडपासून लांब राहिले. हा माझा वैयक्तिक त्याग आहे. माझ्या वयात इतर युवा फास्टफूट खातात. मी याचा त्याग केला. मी फक्त खेळावर ध्यान केंद्रित करत होते. याशिवाय मी आठ वर्ष एकही दिवस सुट्टी घेतली नाही, असे देखील लवलिना म्हणाली.
टोकियो ऑलिम्पिकनंतर तु तुझ्या खेळात काही बदल करणार आहेस का असे विचारले असता, लवलिनला म्हणाली, हा ऑलिम्पिक संपला आहे. मी ही बाब येथेच विसरली आहे. आता मी प्रत्येक गोष्टींचा नव्याने सुरूवात करेन.