महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

कोरोनामुळे आमचा संघ ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार नाही, 'या' देशानं केलं जाहीर

कॅनडा ऑलिम्पिक संघटनेने, कोरोना विषाणूच्या धोक्यामुळे आम्ही टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार नसल्याचे, म्हटलं आहे.

Tokyo 2020 Olympics in doubt as Canada becomes first team to pull out over coronavirus
कोरोनामुळे आमचा संघ ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार नाही, 'या' देशानं केलं जाहीर

By

Published : Mar 23, 2020, 11:26 AM IST

मुंबई - कोरोना विषाणूच्या वाढत्या धोक्यामुळे टोकियो ऑलिम्पिकवर अनिश्चिततेचे सावट आहे. पण, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघ ऑलिम्पिक वेळेवर होणार, यावर ठाम आहे. अशात कॅनडाने आपले खेळाडू ऑलिम्पिकमध्ये पाठवणार नसल्याचे, जाहीर केलं आहे. कॅनडाने रविवारी यांची घोषणा केली.

कॅनडा ऑलिम्पिक संघटनेने, कोरोना विषाणूच्या धोक्यामुळे आम्ही टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार नसल्याचे, म्हटलं आहे.

दरम्यान, मागील ४८ तासांमध्ये कॅनडाशिवाय अनेक देशांनी कोरोना विषाणूच्या वाढत्या धोक्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला केली आहे.

तसेच संभाव्य खेळाडूंचा संघ (ग्लोबल अ‍ॅथलिट) यांनी देखील कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण जग एकत्र आले असल्याने 'आयओसी'नेसुद्धा लवकरच ऑलिम्पिक पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा, असं अपील केलं आहे.

कोरोना विषाणूने जगभरात हाहाकार माजवला असून या विषाणुमुळे १४ हजाराहून अधिका लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशा स्थितीत ऑलिम्पिकचे आयोजन धोक्याचे ठरेल, असे जाणकाराचं म्हणणे आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटना यावर काय निर्णय घेते हे पाहवं लागेल.

हेही वाचा -Corona Virus : टोकियो ऑलिम्पिक पुढे ढकला... आंतरराष्ट्रीय खेळाडूंचाही पाठिंबा

हेही वाचा- ऑलिम्पिक निर्धारित वेळेत होणार नाही, पण...

Corona Virus : मोदींच्या 'जनता कर्फ्यू'चे न्यूझीलंडमधून कौतूक

ABOUT THE AUTHOR

...view details