फ्लोरिडा - दिग्गज गोल्फर टायगर वुड्स आणि फिल मॅकलसन यांनी कोरोना लढ्यात आपले अमूल्य योगदान दिले. या दोन खेळाडूंनी टॉम ब्रॅडी आणि पियोट मॅनिंग यांच्यासह चॅरिटी गोल्फ स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेतून त्यांनी 2 कोटी डॉलर्स जमा केले आहेत.
एका वृत्तानुसार, दक्षिण फ्लोरिडामध्ये वुड्स आणि मॅनिंगने दमदार कामगिरीचे प्रदर्शन केले. या दोघांनी विजयापर्यंत आघाडी ठेवली. वुड्स म्हणाला, "मी टॉम आणि पियोट यांना सलाम करतो. ही आमची लढाई आहे आणि आम्ही जगण्याकरता ती लढतो. टॉम आणि पियोट जे करतात ते मी मैदानात जाऊन करू शकत नाही .''