बंगळुरू - भारताची आघाडीची धावपटू हिमा दास हिने अवघ्या १८-१९ दिवसाच्या कालावधीत, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पाच सुवर्णपदके जिंकली. अशी कामगिरी करणारी ती भारताची पहिली महिला खेळाडू ठरली. त्यानंतर हिमा दास हिचे भारतासह जगभरातून कौतूक होत आहे. याच पार्श्वभूमिवर कर्नाटकातील बन्नेरघट्टा प्राणीसंग्रहालयाने जागतिक व्याघ्र दिवसाच्या निमित्ताने हिमा दासचा आगळावेगळा सन्मान केला. संग्रहालय प्रशासनाने संग्रहालयातील वाघाच्या सहा महिन्याच्या बछड्याचे नामकरण हिमा असे केले आहे. रविवारी याची घोषणा करण्यात आली आणि सोमवारी (२९ जुलै) ला नामाकरण कार्यक्रम पार पडला.
'ढिंग' एक्सप्रेसचा अनोखा गौरव.! वाघाच्या बछड्याला दिलं 'हिमा' दासचे नाव - Tiger
कर्नाटकातील बन्नेरघट्टा प्राणीसंग्रहालयाने जागतिक व्याघ्र दिवसाच्या निमित्ताने हिमा दासचा आगळावेगळा सन्मान केला. संग्रहालय प्रशासनाने संग्रहालयातील वाघाच्या सहा महिन्याच्या बछड्याचे नामकरण हिमा असे केले आहे. रविवारी याची घोषणा करण्यात आली आणि सोमवारी (२९ जुलै) ला नामकरण कार्यक्रम पार पडला.
रविवारी नाव देण्यात आलेल्या वाघाच्या बछड्याला इतर तीन बछड्यांसह जंगलात सफारीसाठी सोडण्यात आले. दरम्यान पहिल्यादांच एखाद्या प्राण्याला खेळाडूचे नाव देण्यात आले असे नाही. काही महिन्यांपूर्वीच बन्नेरघट्टाच्या रेस्कू सेंटरमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी आणि भारतीय महिली संघाची माजी कर्णधार मिताली राज यांचे नाव दोन अस्वलाला देण्यात आली आहेत.
संग्रहालयाचे अधिकारी डी. एस. रविचंद्रन यांनी सांगितले की, पर्यटकांना आता संग्रहालयातील सफारी भागात एकूण १२ वाघ पाहायला मिळतील. यामध्ये ४ पांढऱ्या वाघांचा समावेश आहे. हिमा दास हिने उत्तुंग कामगिरी केल्याने तिचा सन्मान म्हणून हिमाचे नाव देण्यात आले.