लॉसने - आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदासाठी (आयओसी) दुसऱ्यांदा निवडणूक लढवण्याचा आपला मानस असल्याचे थॉमक बाख यांनी सांगितले आहे. गुरुवारी आयओसीच्या बैठकीत बाख यांनी ही प्रतिक्रिया दिली. बाख यांच्या इच्छेला उर्वरित सदस्यांकडूनही एकमताने पाठिंबा मिळाला. त्यामुळे ते दुसऱ्यांदा विजयी होण्याची शक्यता वाढली आहे. कोरोना व्हायरसमुळे ही बैठक ऑनलाइन घेण्यात आली.
आयओसीच्या अध्यक्षपदासाठी मी पुन्हा तयार - थॉमक बाख - थॉमक बाख लेटेस्ट न्यूज
बाख म्हणाले, ''तुम्हाला जर आयओसीचा सदस्य हवा असेल तर आयओसीचा अध्यक्ष म्हणून मी दुसऱ्यांदा निवडणूक लढवू शकतो आणि आपणा सर्वांना आवडणाऱ्या ऑलिम्पिक चळवळीला मी पुढे चालू ठेवू शकतो.'' आयओसीच्या यूट्यूब चॅनेलवर ही बैठक दाखवण्यात आली.

10 सप्टेंबर 2013 रोजी बाख आयओसीच्या अध्यक्षपदी निवडले गेले. त्यांनी जॅक्स रोजी यांची जागा घेतली. यावर्षी 24 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित केली गेली होती, परंतु कोरोनाव्हायरसमुळे ती एका वर्षासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. ऑलिम्पिक स्पर्धा तहकूब करण्याची घोषणा होईपर्यंत एकूण 57 टक्के पात्रता पूर्ण झाली होती. पुढच्या वर्षी ऑलिम्पिक स्पर्धा 23 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत घेण्यात येणार आहे.