त्रिनिनाद -श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer ) हा क्रिकेट टीम इंडियातील ( India Cricket Team ) स्टार खेळाडूंपैकी एक खेळाडू आहे. वेस्ट इंडिज ( West Indies ) विरुद्धच्या पहिल्या सामन्यामध्ये श्रेयसने संघासाठी 54 रन्सची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. त्यानंतर टीमने 3 रन्सने सामना जिंकला आहे. दरम्यान श्रेयस भर मैदानामध्ये डान्स ( Dance cricket ground ) करताना दिसून आला. जो चाहत्यांनाही खूप जास्त प्रमाणात आवडला आहे. पण आता श्रेयसनेच डान्स करण्या पाठीमागचे कारण यावेळी त्यांनी सांगितले आहे.
चाहते चिडवत होते -श्रेयस अय्यरने आपला सहकारी खेळाडू मोहम्मद सिराजशी संवाद साधताना त्याच्या या डान्स पाठीमागचे कारण सांगितले आहे. तो म्हणाला, 'मी फिल्डींग करत होतो आणि वेस्ट इंडिजचे चाहते मला चिडवत होते. कॅच सोडा, कॅच सोड असे, ते म्हणत होते. अशा परिस्थितीत जेव्हा कॅच माझ्याकडे आला, तेव्हा मी त्यांच्यासारखाच नाचलो.
सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर -श्रेयसच्या या वक्तव्यावरून हे स्पष्ट झाले आहे की, त्याची प्रतिक्रिया वेस्ट इंडिजच्या प्रेक्षकांच्या कृतीला योग्य प्रत्युत्तर होते. मुळात, श्रेयस खूप चांगला डान्सर आहे. तो त्याच्या सोशल मीडियावर ( Share video on social media ) स्वतःच्या डान्स मूव्हचे व्हिडिओ शेअर करत राहत असतो. शिवाय श्रेयसची सख्खी बहीण देखील खुप चांगली डान्सर आहे.
ओव्हर विषयी चर्चा -पहिल्या वनडे सामन्यात मोहम्मद सिराज आणि मिडल ऑर्डरमधील फलंदाज श्रेयस अय्यर यांनी एकमेकांची मुलाखत घेतली होती. बीसीसीआयने या मुलाखतीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या मुलाखतीमध्ये सिराजने श्रेयसशी शेवटच्या ओव्हर विषयी चर्चा केली होती. त्यावेळी श्रेयसने शामराह ब्रूक्सचा झेल घेतल्यावर नेमका का डान्स केला याचा खुलासा केला आहे.